Posts

Image
  ‘तो' एक कप चहा तुझ्यासाठी एक पेय असेल, पण सकाळचा 'तो' एक कप चहा माझ्यासाठी प्रत्येक घोटात अनेक विचार फुलवणारा असतो .... दिवसभर माझ्या या अतृप्त पोटात हे पेय इच्छा, आग्रह, गरज तर कधी व्यसन म्हणून उतरतं .... पण त्याच चहाचा एक घोट घशातून अलगद पोटात सरकतो, अन त्याचा तोच स्पर्श डोक्यातल्या विचारांची हलकीच तार छेडतो.... अरेsss काय सांगू तुला ? हा सकाळचा पहिला चहा प्यायला मी रात्रीपासून तयारी करतो... होय !!! रात्री झोपी गेलेले ते सुप्त विचार सकाळी ताजेतवाने होऊ पाहतात .... खरंतर त्या सगळ्यांचा एकत्र बाहेर पडण्याचा आग्रह असतो पण चहाचा दुसरा घोट त्यावर अलगद नियंत्रण आणतो.... 'तो' एक कप चहा अख्या दिवसभराचं वेळापत्रक लावतो... अन त्याच कपातला ‘शेवटचा घोट’ मात्र मला वर्तमानात आणतो. ----- स्नेहल PC-  Manish Balapure
Image
'त्याला' मोदक आणि 'तिला'.....? काय विरोधाभास आहे ना आपल्याकडे...! देव्हाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तीला पंचपक्वान्न फारंच सोपस्कारात दिले जातात आणि पशूप्राण्यांना कुठलाही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता काहीही आपण खायला घालतो ? असला प्रकार फक्त केरळमध्येच नाही तर जिथं जिथं हा मनुष्य नावाचा असंवेदनशील प्राणी राहतो तिथं तिथं बघायला मिळेलंच. काय म्हणून अगदी सकाळ संध्याकाळ न चुकता शुचिर्भूत होऊन चांगले चांगले पदार्थ देवापुढं ठेवतो ? खरंच सांगा मंदिरातले किंवा घरातील देव खातात का हे सगळं? शेवटी ते शिळं झालं की बाहेर गाई म्हशी नाहीतर कुत्र्यांसमोर घातलं जातं.... मी जरी पूजापोथी करत नसले तरी पूजाअर्चा करण्याला, नैवेद्य दाखवायला माझा विरोध नाही....निसर्गातल्या दृष्टीस न पडणाऱ्या पण सतत जाणवत असणाऱ्या त्या दिव्य शक्तीवर माझा विश्वास आहे. माणुसकीचे धडे कुणालाही देण्याआधी आपणच आपल्या घरात डोकावून बघितलं तर सत्य पुढं येईल. गाभाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तींना चमचमीत पदार्थ आणि निष्पाप, मुक्या प्राण्यांना कधी टाचण्या, खिळे घातलेलं अन्नतर कधी फटाके घातलेले फळं !...
Image
"कोरोना"  का  रोना... "कोरोना" का जब तक है रोना, आप अपने स्वास्थ्य हेतु हाथ जरूर धोना । शुद्ध खाना और भरपूर जल पीना अभी गंदगीसे बचकर ही है जीना । अब आगे तो कुदरत अपने हर रंग बदलेगी, आप 'कोरोना' से सबक सिख आजही से सुधर जाना । दूर देश फ़से अपनोके लिए आप दुआए करना, उसे मांगने मंदिर - मस्जिद या गुरद्वाऱ ना जाना, घर बैठे ही दिल से माँगना । दरवाज़े मंदिर और मस्जिदोके बंद होते है दिलों के नहीं, सच सबको पता है... भगवान दिलमें है पत्थर और फोटोंमें नहीं । आजकी ये सोशल मिडियावाली जिंदगीमें अफवावोंसे न डरना । अच्छे 'नागरिक' बन,सोचकर कदम बढ़ाना। भले कितनेभी आए संकट हमें अपने देशको है संभालना, हाथ जोड़; झुकाये मस्तक देशकी संस्कृतीका 'सन्मान' है करना । अभी मिली छुट्टियों में घर बैठे मिल-जुलकर भ्रष्टाचार का कोई 'प्लान' ना करना । अपनेही देशकी जनतासे क्यों है तुम्हें खिलवाड़ करना ? 'समय' दे रहा है 'कुदरत'तो आजही संभल जाना । 'राक्षस' से 'रक्षक' होकर जिंदगी खुल...
Image
'सेक्स वर्कर', 'काँडम टीचर'  आणि बरंच .... नोकरीसाठी बँगलोरआल्यानंतर माझ्या बोलण्यातून वाचनाची आवड बघून माझ्या कलिगने काही इंग्रजी पुस्तकं मला वाचायला दिली. त्यात काही ब्रॅंडिंग, पॅकेजिंग होती तर काही फिलॉसॉफी. मात्र ही सगळीच इंग्रजीत होती. एकंदरीत माझा इंग्रजी वाचनाकडे कल तसाही कमीच होता. त्यामुळे हो वाचू वाचू म्हणून टाळत गेले. पण या लोकडाऊनमुळे सुट्टीचा सदुपयोग म्हणून हातात घेतले, तर त्यात मला एक अतिशय वेगळ्या विषयाचं पुस्तकं हाती आलं. "The Autobiography of a Sex worker" Writer 'Nalini Jameela'. पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचं एक छोटंसं मोजक्या रेषांचा वापर करून केलेलं इल्लस्ट्रेशन आणि त्याच रफ पण हॅन्डरायटिंग स्टाईलनं लिहिलेलं पुस्तकाचं टायटल फार आकर्षक आहे . हा विषय आणि मुखपृष्ठ (कव्हर ) दोन्ही फार टेम्टिंग वाटलं मला. कारण, आतापर्यंत एखादा नट- नटी, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, खेळाडू हे आपले आत्मकथन लिहितात हे मला माहित होतं. कॉलेजमध्ये असतांना स्टीव्ह जॉब, सचिन तेंडुलकर, रीशी कपूर अशा काही दिग्गजांची बायोग्राफी वाचण्यात आली. शिवा...
Image
आजचे शिवभक्त !!! छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आणि संघर्षाचे पोवाडे गात गडकिल्ले आजही उभे आहेत. शिवबानंविषयी माहिती सांगणारे अनेक महान ग्रंथ, पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधून उपलब्ध आहे. त्यांची राजनीती ते युद्धनीती, धार्मिक ते कौटुंबिक प्रसंग मांडणारे अनेक ताकदीचे नाटकं, सिनेमे अजूनही आपण पाहतो आहे. शिवबांविषयी आणखीन नवीन मी सांगू आणि काय बोलू ? पण मला मात्र त्यांच्या 'आज'च्या भक्तांविषयी नक्कीच बोलावंस वाटतं. महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र्रातच नाही तर जगभर आहेत. प्रत्येकाला महाराजांची जयंती, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो करावाच. आजच्या दिवशी त्यांचा संदेश पोहोचवणारे पथनाट्य रस्त्यावर करा, होर्डिंग - बॅनर सगळं लावा आणि मिरवनुकीही काढा आमचं काहीही दुमत नाही. शिवाय महाराजांच्या मूर्तीबरोबर काढलेले सेल्फी आज सोशल मीडियावर टाका त्याला देखील आमचा विरोध नाही. फक्त एक प्रश्न आहे तेही आजच्या सगळ्या शिवभक्तांना !छ. शिवाजी महाराजांसाठी काढलेल्या मिरवणुकीत किंवा रॅलीत नारे देताना जर रस्त्यात चुकून कुणाचा कुणाला धक्का लागला तर "जय भवानी, ज...
Image
एक खंत उराशी राहील आता ... आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि अचानक निघूनही जातात पण त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्याने मन खिन्न होतं . त्यांच्या नसण्य ाची जाणिव ही तेव्हा तीव्र होते जेव्हा आपल्याला माहित होतं की आपल्या प्रवासाची सुरुवात या व्यक्तीच्या आशिर्वादाशिवाय , मार्गदर्शनाशिवाय शक्यच नाही, तेव्हा मात्र पुढचा मार्ग कठीण होऊन बसतो .... PHD करायची म्हणजे काही दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाची गरज भासतेच.त्या संदर्भात मार्गदर्शन हवे म्हणून आणि माझ्या मनात विषय निवडीवरून जो गोंधळ होतोय त्या संदर्भात चर्चा करावी म्हणून"ग्रंथसखा"ग्रंथालयाचे प्रणेते "श्री श्याम जोशी" सर याना आज भेटायचे ठरले. त्यांनी दिलेल्या वेळात बदलापूर गाठून"ग्रंथसखा"मध्ये आमची चर्चा सुरु झाली . तिथे पेस्ट कंट्रोलचे काम सुरु असल्याने भल्या मोठ्या पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे जिकडे तिकडे नीट उभे करून ठेवले होते . ते बाजूला सारून आम्ही मधोमध चर्चा करायला बसलो . त्यांना मी टायपोग्राफी मध्येMFA केले असे सांगताच, त्यांनी म्हटलं पुढचा प्रवासही त्यातच करावा असे मत व्यक्त केले आणि...
Image
पटनासे आया एक खत... सायकलनं भारतभर 'कलाप्रवास' करण्याची 'प्रतिक'ची ही भन्नाट कल्पना ऐकूनच त्याची पहिली मुलाखत मी 'चिन्ह' साठी घेतली होती. ही मुलाखत सोशल मीडियावर बरीच गाजली. हा प्रवास सुरु करतांना अनेक अडचणी आल्यात. प्रतिकच्या कलाप्रवास सुरु करण्याच्या तारखा सतत बदलत होत्या. त्याला पावसानं यावर्षी घातलेला गोंधळ ही बऱ्याच अंशी कारणीभूत होता. ठरवलेल्या रस्त्यांवर इतका बेधुम पाऊस होता की, रस्ते देखील बेपत्ता झाले होते. शिवाय अनेक तांत्रिक अडचणी सोबतीला होत्याच. प्रवास सुरु कर ण्याधीपासून प्रवासात काय करावं ? काय नको ? कसं डॉक्युमेंटेशन करावं किंवा व्हावं यावर अधून मधून प्रतीक आणि माझी चर्चा सुरु असायची. हा काही थोडा थोडका प्रवास नव्हता तब्बल एक वर्ष ४ महिने त्याची भ्रमंती चालणार आहे. या प्रवासात स्वतःच मनोबल कसं वाढवत राहावं यावर बोलणं सुरु असतांनाच एकदा त्यानं सांगितलं की, 'तो या कलाप्रवासात सहभागी सगळ्यांना प्रवास सुरु झाला की तो जिथं कुठं असेल तिथनं पत्र लिहिल'. त्याची ही कल्पना छानच होती पण मला वाटलं कसं शक्य होईल याला ? एवढी सायकल ...