आजचे शिवभक्त !!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आणि संघर्षाचे पोवाडे गात गडकिल्ले आजही उभे आहेत. शिवबानंविषयी माहिती सांगणारे अनेक महान ग्रंथ, पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधून उपलब्ध आहे. त्यांची राजनीती ते युद्धनीती, धार्मिक ते कौटुंबिक प्रसंग मांडणारे अनेक ताकदीचे नाटकं, सिनेमे अजूनही आपण पाहतो आहे. शिवबांविषयी आणखीन नवीन मी सांगू आणि काय बोलू ?
पण मला मात्र त्यांच्या 'आज'च्या भक्तांविषयी नक्कीच बोलावंस वाटतं.
महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र्रातच नाही तर जगभर आहेत. प्रत्येकाला महाराजांची जयंती, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो करावाच. आजच्या दिवशी त्यांचा संदेश पोहोचवणारे पथनाट्य रस्त्यावर करा, होर्डिंग - बॅनर सगळं लावा आणि मिरवनुकीही काढा आमचं काहीही दुमत नाही. शिवाय महाराजांच्या मूर्तीबरोबर काढलेले सेल्फी आज सोशल मीडियावर टाका त्याला देखील आमचा विरोध नाही.

फक्त एक प्रश्न आहे तेही आजच्या सगळ्या शिवभक्तांना !छ. शिवाजी महाराजांसाठी काढलेल्या मिरवणुकीत किंवा रॅलीत नारे देताना जर रस्त्यात चुकून कुणाचा कुणाला धक्का लागला तर "जय भवानी, जय शिवाजी " असे नारे अर्धवट सोडून "आय - माय ते झ " पर्यंतच्या शिव्या लगेच कश्या काय निघतात ? " जय भवानी वरून लगेच ' ए भ$$$$$ वर लगेच येता ? कसे हाणामारीवर पटकन उतरता ? हा कसला आदर्श ? पोस्टर होर्डिंगवर महाराजांचा फोटो एका कोपऱ्यात आणि कार्यकर्त्यांचे फोटो झूम करून करून लावण्यात काय मिळतं ? तेही कमी की काय बॅनरवर महाराजांचे पोवाडे आणि गाणी प्रिंट करतांना निदान जाणकारांकडून मराठी तरी तपासून घ्या रे !!!
शिवभक्त म्हणवून घेताना थोडं भान ठेवा हो !! एकदा इतिहास वाचून घ्या.... नसेल वाचता येत तर विचारा ... पण एकदा स्वतःची वागणूक तरी बघा... छत्रपती शिवाजी महाराज जनतेचा राजा होता ... तो 'जाणता राजा' होता. 🙏🙏
जय हिंद । जय महाराष्ट्र । 🙏🙏
स्नेहल बाळापुरे
स्नेहल बाळापुरे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteI cant read your comment or emoji
Deletecan you please comment again?
thanks