
पि हू ही माझी मैत्रीण ... आमची मैत्री अमरावतीच्या कॉलेजपासून सुरु झाली... पुढच्या शिक्षणासाठी आम्ही गाव सोडलं .... नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहायला गेलो .... त्यामुळे तिची नि माझी ताटातूट झाली.... जेव्हा कधी गावी गेले तर ती एखादवेळ घरी यायची ... नाही तर फोन - मेसेजवर बोलणं व्हायचं तेही खूप नाही तीन चार सहा महिन्यातून कधीतरी ... पण आमच्या मैत्रीत कधी अबोला झाला नाही .... कॉल मेसेज केले नाहीत म्हणून कधी भांडण झाले नाहीत .... ज्याला आठवण झाली तो विचारपूस करायला आवर्जून कॉल करणार .... एवढंच साधारण आठ-नऊ महिन्यापूर्वी पिहूच लग्न जुळलं. तिचं लग्न माझ्या आधी होणं साहजिकचं होतं, कारण आम्ही एका वर्गात असलो तरी ती वयाने तीन चार वर्षाने मोठीच होती. ती एक दुसरी डिग्री पूर्ण करून आमच्या कॉलेजमध्ये शिकायला आली होती. वर्गात मोजक्याच लोकांशी ती बोलायची त्यामुळे आमच्या वर्गात आम्ही तिच्या ५/६ मित्र मैत्रिणी असू .... तिच्या लग्न जुळल्याचे आणि साखरपुड्याचे फोटोस तिने आम्हा मित्रमैत्रिणींना पाठवलेत.... पण मित्रपरिवारातल्या कुणालाही आग्रहाचं निमंत्रण नव्हतं.... आम्ही सगळे वेगवेगळ्या शहरात आहोत म्...