
आजचे शिवभक्त !!! छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आणि संघर्षाचे पोवाडे गात गडकिल्ले आजही उभे आहेत. शिवबानंविषयी माहिती सांगणारे अनेक महान ग्रंथ, पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधून उपलब्ध आहे. त्यांची राजनीती ते युद्धनीती, धार्मिक ते कौटुंबिक प्रसंग मांडणारे अनेक ताकदीचे नाटकं, सिनेमे अजूनही आपण पाहतो आहे. शिवबांविषयी आणखीन नवीन मी सांगू आणि काय बोलू ? पण मला मात्र त्यांच्या 'आज'च्या भक्तांविषयी नक्कीच बोलावंस वाटतं. महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र्रातच नाही तर जगभर आहेत. प्रत्येकाला महाराजांची जयंती, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो करावाच. आजच्या दिवशी त्यांचा संदेश पोहोचवणारे पथनाट्य रस्त्यावर करा, होर्डिंग - बॅनर सगळं लावा आणि मिरवनुकीही काढा आमचं काहीही दुमत नाही. शिवाय महाराजांच्या मूर्तीबरोबर काढलेले सेल्फी आज सोशल मीडियावर टाका त्याला देखील आमचा विरोध नाही. फक्त एक प्रश्न आहे तेही आजच्या सगळ्या शिवभक्तांना !छ. शिवाजी महाराजांसाठी काढलेल्या मिरवणुकीत किंवा रॅलीत नारे देताना जर रस्त्यात चुकून कुणाचा कुणाला धक्का लागला तर "जय भवानी, ज...