लग्नाची घालमेल ....

काय लग्न कधी करणार ! लग्न करणार ना !

हा प्रश्न एका मुलाने मुलींला वा मुलीने मुलाला विचारला तर आश्यर्यची गोष्ट नाही पण हाच प्रश्न वयात आलेल्या मुला - मुलींना कुटुंबात समाजात वावरतांना विचारला कि त्यांना शहारा उभा राहतो हे नक्कीच ! लग्नाचा विचार करते कि नाही ? कधी चढणार बोहोल्यावर ? हा प्रश्न कधी कधी तितकाच त्रासदायक होतो जितका नापास होणाऱ्या मुलांना आपले मार्क्स सांगायला होतो. काय उत्तर द्यावं हे सुचतच नाही.

हल्लीच्या युवा पिढीचा कल हा पैसे कमवणे ,यश संपादित करणे, नाव कमावणे यावर धाव घेणारा आहे. याचा अर्थ असा नाही कि लग्नच करायचंच नाही पण मुलगा असो वा मुलगी स्वातंत्र्यरित्या पायावर उभं राहणं हि काळाची गरज झाली आहे . सगळ्यांना आपल्या- आपल्या परीने स्वबळावर उभं राहून काही सिद्ध करायचं आहे, यात वावगं असे काहीच नाही माझ्या या मताला बहुदा सगळे सहमत हि असतील.






प्रश्न तिथे उभे राहतात जेव्हा आमची स्वप्न काही वेगळी असतात ती यशोपदावर येत असतानाची चिन्ह दिसत असतांनाचमुलींचे वय हा गंभीर प्रश्न पुढे ठाण मांडून उभा राहतो ! आणि मग सुरु होतो खऱ्या अर्थाने' समाज " या नावाचा असाह्य टॉर्चर ! मान्य आहे पुर्वजांनी काही अभ्यास करून लग्न हि परंपरा सुरु केली असेल पण एक माणूस म्हणून तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचे काही कर्तव्य आहे, स्वप्न आहे, ती पूर्ण करताना काय करावं आणि काय नको म्हणजेच लग्न करावं कि नको हा तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्यावा.

मध्यम वर्गीय कुटुंबात मुलांच्या स्वप्नांपेक्षा समाज या घटकाला इतके प्राध्यान्य देण्यात येते कि तिथे " भावना" हा फक्त शब्द म्हणूनच उरतो. मुलगी असेल तर मग विचारूच नका ! एरव्ही मुलगा मुलगी एक समान असे पोवाडे गाणारा आपला समाज लग्न करताना अहो ! मुलगा आहे तो इच्छा झाली की करेल लग्न .. आणि मुली बाबतीत मात्र अगदी या उलटच. मेरी कॉम , दंगल या सारखे चित्रपट पाहून सिनेमाघरात प्रोत्सहीत होणार आपला समाज सिनेमा संपताच त्यातून शिकलेला धडा घराच्या उंबरठयावरच झटकून घरात जातो आणि 
परत जैसे थे !

समाज हा कुठल्या मानसिकतेवर बनतो हा सतत भुरळ घालणारा प्रश्न आहे . म्हणजे बघा ना, काही ठिकाणी असे अनुभवायला येतात जिथं सीरिअल आणि सिनेमातले प्रेम प्रकरण पाहण्यात ह्यांना आनंद होतो , त्यातला नट नटींची प्रेम विरह यांना हळवा करून जातो पण शेजारच्या कुणाच्या मुलामुलींचं प्रेम प्रकरणाचा गंध जरी आला ना तर

हा समाज आपलं खरं रूप दाखवू पाहतो !







Comments

  1. मस्त लेख. I agree but I'm still optimistic about our society. :) समाजाची मानसिकता बदलायला वेळ लागेल. आपल्या आई बाबांच्या जनरेशन मध्ये पंचविशी च्या आसपास लग्नं व्हायची तेच वय आता तिशीपर्यंत गेलंय. शिक्षण आणि करिअर च्या बदललेल्या व्याख्यांमुळे खऱ्या अर्थाने 'सेटल' व्हायची वेळ २-३ वर्षांनी पुढे गेलीये हे आता कुठे लोकांच्या लक्षात यायला लागलंय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog