Posts

असं ही एक प्रेमाच रिटर्न गिफ्ट ..

काय काळ बदलतोय ! नाही ! कौतुक करावं तेवढं थोडं हो ! या काळाचं ..  हल्ली प्रत्येक ठिकाणी रिफंड मिळतं हो . बाजारात , ऑनलाईन शॉपिंग, एवढंच काय तर आमच्या सोसायटीच्या बाहेरचा भाजीवाला  भय्यापण हल्ली भाजी खराब निघाली तर रिफंड देतो अजून काय हवंय ? तुम्हीच सांगा ! पण मला असं वाटतं की माणुसकीच्या बदल्यात पण माणुसकीच मिळावी ( रिफंड व्हावी) .  पण, घडतं मात्र विपरीतच . काही ठिकाणी एवढी माणुसकीची  ट्रान्स्परन्सी दिसत असताना माझ्या मैत्रिणीला मात्र प्रेमाच्या रिफंडमध्ये "असह्य वेदना"च मिळाल्या .   होय ! ही एक खरी गोष्ट आज तुमच्या पुढं  मुद्दाम मांडते आहे . ही तर माझ्या जवळच्या मैत्रीणीची गोष्ट आहे पण असं किती तरी मुलींबरोबर होत असेल ज्या समाजाच्या भीतीने आजही कुठे तरी देशाच्या, शहराच्या किंवा एखादया गावाच्या कानाकोपऱ्यातया असंख्य असह्य वेदना  मनात   दाबून  रोज गुपचूप रडून गप्पपणे जगत असतील.  आता तर एक ट्रेण्ड सुरु झाला आहे  की , तुमच्यावर (मुलींवर ) "मी टू हॅश टॅग" लिहून पोस्ट केलं की लगेच कळतं की ओह्ह ... ! हिच्या स...

लग्नाची घालमेल ....

Image
काय लग्न कधी करणार ! लग्न करणार ना ! हा प्रश्न एका मुलाने मुलींला वा मुलीने मुलाला विचारला तर आश्यर्यची गोष्ट नाही पण हाच प्रश्न वयात आलेल्या मुला - मुलींना कुटुंबात समाजात वावरतांना विचारला कि त्यांना शहारा उभा राहतो हे नक्कीच ! लग्नाचा विचार करते कि नाही ? कधी चढणार बोहोल्यावर ? हा प्रश्न कधी कधी तितकाच त्रासदायक होतो जितका नापास होणाऱ्या मुलांना आपले मार्क्स सांगायला होतो. काय उत्तर द्यावं हे सुचतच नाही. हल्लीच्या युवा पिढीचा कल हा पैसे कमवणे ,यश संपादित करणे, नाव कमावणे यावर धाव घेणारा आहे. याचा अर्थ असा नाही कि लग्नच करायचंच नाही पण मुलगा असो वा मुलगी स्वातंत्र्यरित्या पायावर उभं राहणं हि काळाची गरज झाली आहे . सगळ्यांना आपल्या- आपल्या परीने स्वबळावर उभं राहून काही सिद्ध करायचं आहे, यात वावगं असे काहीच नाही माझ्या या मताला बहुदा सगळे सहमत हि असतील. प्रश्न तिथे उभे राहतात जेव्हा आमची स्वप्न काही वेगळी असतात ती यशोपदावर येत असतानाची चिन्ह दिसत असतांनाचमुलींचे वय हा गंभीर प्रश्न पुढे ठाण मांडून उभा राहतो ! आणि मग सुरु होतो खऱ्या अर्थाने' समाज " या नावाचा ...