'झी'वर गाजला कलाविद्यार्थ्यांचा आल्बम! सध्याच्या काळातला कोरोनाचा कहर आणि हा लोकडाऊन बघता चित्रकलेपासून ते नाट्यकलेपर्यंत सगळीकडेच मंदी आलेली आहे. पण याच कठीण काळात काही कलाकारांनी आपल्या कलागुणांमुळे नावलौकिक मिळवलेला आहे, त्यामध्ये नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचं नावं प्रामुख्यानं सामोरं येतंय. 'कुंभाराचा गणपती' हा एक मार्मिक सत्य मांडणारा म्युसिकअल्बम कला विद्यार्थांनी तयार करून एक आदर्श नव्या विद्यार्थ्यांपुढं मांडलाय. त्यांच्या कामाचं कौतुक आज जगभरातून होतंय. त्यांचा हा कुंभारासारख्या कलाकाराच्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकणारा आणि त्याचबरोबर एक सामाजिक संदेश देणारा म्युसिकअल्बम 'ZEE Music' द्वारे नुकताच प्रदर्शित केल्या गेला. गेल्या काही तासातच त्यांना ११ मिलियन्सपेक्षा जास्त प्रेक्षक लाभला आहे. नागपूरच्या कुंभारवाडीत या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. धो-धो कोसळणारा पाऊस, त्यात कोविड-१९ चे नियम, शिवाय अनेक तांत्रिक अडचणी सांभाळून या गाण्याचं चित्रीकरण अवघ्या एका आठवड्यात पूर्ण करून ते झीकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. म्हणूनच ग
Posts
Showing posts from September, 2020