Posts

Showing posts from June, 2020
Image
'त्याला' मोदक आणि 'तिला'.....? काय विरोधाभास आहे ना आपल्याकडे...! देव्हाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तीला पंचपक्वान्न फारंच सोपस्कारात दिले जातात आणि पशूप्राण्यांना कुठलाही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता काहीही आपण खायला घालतो ? असला प्रकार फक्त केरळमध्येच नाही तर जिथं जिथं हा मनुष्य नावाचा असंवेदनशील प्राणी राहतो तिथं तिथं बघायला मिळेलंच. काय म्हणून अगदी सकाळ संध्याकाळ न चुकता शुचिर्भूत होऊन चांगले चांगले पदार्थ देवापुढं ठेवतो ? खरंच सांगा मंदिरातले किंवा घरातील देव खातात का हे सगळं? शेवटी ते शिळं झालं की बाहेर गाई म्हशी नाहीतर कुत्र्यांसमोर घातलं जातं.... मी जरी पूजापोथी करत नसले तरी पूजाअर्चा करण्याला, नैवेद्य दाखवायला माझा विरोध नाही....निसर्गातल्या दृष्टीस न पडणाऱ्या पण सतत जाणवत असणाऱ्या त्या दिव्य शक्तीवर माझा विश्वास आहे. माणुसकीचे धडे कुणालाही देण्याआधी आपणच आपल्या घरात डोकावून बघितलं तर सत्य पुढं येईल. गाभाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तींना चमचमीत पदार्थ आणि निष्पाप, मुक्या प्राण्यांना कधी टाचण्या, खिळे घातलेलं अन्नतर कधी फटाके घातलेले फळं !