असं ही एक प्रेमाच रिटर्न गिफ्ट ..
काय काळ बदलतोय ! नाही ! कौतुक करावं तेवढं थोडं हो ! या काळाचं .. हल्ली प्रत्येक ठिकाणी रिफंड मिळतं हो . बाजारात , ऑनलाईन शॉपिंग, एवढंच काय तर आमच्या सोसायटीच्या बाहेरचा भाजीवाला भय्यापण हल्ली भाजी खराब निघाली तर रिफंड देतो अजून काय हवंय ? तुम्हीच सांगा ! पण मला असं वाटतं की माणुसकीच्या बदल्यात पण माणुसकीच मिळावी ( रिफंड व्हावी) . पण, घडतं मात्र विपरीतच . काही ठिकाणी एवढी माणुसकीची ट्रान्स्परन्सी दिसत असताना माझ्या मैत्रिणीला मात्र प्रेमाच्या रिफंडमध्ये "असह्य वेदना"च मिळाल्या . होय ! ही एक खरी गोष्ट आज तुमच्या पुढं मुद्दाम मांडते आहे . ही तर माझ्या जवळच्या मैत्रीणीची गोष्ट आहे पण असं किती तरी मुलींबरोबर होत असेल ज्या समाजाच्या भीतीने आजही कुठे तरी देशाच्या, शहराच्या किंवा एखादया गावाच्या कानाकोपऱ्यातया असंख्य असह्य वेदना मनात दाबून रोज गुपचूप रडून गप्पपणे जगत असतील. आता तर एक ट्रेण्ड सुरु झाला आहे की , तुमच्यावर (मुलींवर ) "मी टू हॅश टॅग" लिहून पोस्ट केलं की लगेच कळतं की ओह्ह ... ! हिच्या सोबत देखील ती वाईट गोष्ट झाली. पण प्रश्न हा आहे की ज्या