लग्नाची घालमेल ....
काय लग्न कधी करणार ! लग्न करणार ना ! हा प्रश्न एका मुलाने मुलींला वा मुलीने मुलाला विचारला तर आश्यर्यची गोष्ट नाही पण हाच प्रश्न वयात आलेल्या मुला - मुलींना कुटुंबात समाजात वावरतांना विचारला कि त्यांना शहारा उभा राहतो हे नक्कीच ! लग्नाचा विचार करते कि नाही ? कधी चढणार बोहोल्यावर ? हा प्रश्न कधी कधी तितकाच त्रासदायक होतो जितका नापास होणाऱ्या मुलांना आपले मार्क्स सांगायला होतो. काय उत्तर द्यावं हे सुचतच नाही. हल्लीच्या युवा पिढीचा कल हा पैसे कमवणे ,यश संपादित करणे, नाव कमावणे यावर धाव घेणारा आहे. याचा अर्थ असा नाही कि लग्नच करायचंच नाही पण मुलगा असो वा मुलगी स्वातंत्र्यरित्या पायावर उभं राहणं हि काळाची गरज झाली आहे . सगळ्यांना आपल्या- आपल्या परीने स्वबळावर उभं राहून काही सिद्ध करायचं आहे, यात वावगं असे काहीच नाही माझ्या या मताला बहुदा सगळे सहमत हि असतील. प्रश्न तिथे उभे राहतात जेव्हा आमची स्वप्न काही वेगळी असतात ती यशोपदावर येत असतानाची चिन्ह दिसत असतांनाचमुलींचे वय हा गंभीर प्रश्न पुढे ठाण मांडून उभा राहतो ! आणि मग सुरु होतो खऱ्या अर्थाने' समाज " या नावाचा