Posts

Showing posts from August, 2020
Image
  ‘तो' एक कप चहा तुझ्यासाठी एक पेय असेल, पण सकाळचा 'तो' एक कप चहा माझ्यासाठी प्रत्येक घोटात अनेक विचार फुलवणारा असतो .... दिवसभर माझ्या या अतृप्त पोटात हे पेय इच्छा, आग्रह, गरज तर कधी व्यसन म्हणून उतरतं .... पण त्याच चहाचा एक घोट घशातून अलगद पोटात सरकतो, अन त्याचा तोच स्पर्श डोक्यातल्या विचारांची हलकीच तार छेडतो.... अरेsss काय सांगू तुला ? हा सकाळचा पहिला चहा प्यायला मी रात्रीपासून तयारी करतो... होय !!! रात्री झोपी गेलेले ते सुप्त विचार सकाळी ताजेतवाने होऊ पाहतात .... खरंतर त्या सगळ्यांचा एकत्र बाहेर पडण्याचा आग्रह असतो पण चहाचा दुसरा घोट त्यावर अलगद नियंत्रण आणतो.... 'तो' एक कप चहा अख्या दिवसभराचं वेळापत्रक लावतो... अन त्याच कपातला ‘शेवटचा घोट’ मात्र मला वर्तमानात आणतो. ----- स्नेहल PC-  Manish Balapure